Ad will apear here
Next
सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांक
निफ्टी ११ हजार ८०० जवळ, तर सेन्सेक्स ३९ हजार २७६वर.
मुंबई : नऊ सत्रांनंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने दिवसभरात ३९ हजार ३६४चा टप्पा गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ११ हजार ८१० पर्यंत झेप घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स ३७० अंकांनी वधारून ३९ हजार २६४ वर बंद झाला, तर निफ्टी ९७ अंकांनी वधारून ११ हजार ७८७ अंकांवर पोहोचला. 

निफ्टीने दिवसभरात ११ हजार ८०० ची पातळी ओलांडली, मात्र दिवसअखेर तो ही पातळी कायम राखू शकला नाही. आता निफ्टी लवकरच १२ हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, भारताचा निर्यात व्यापारातील विक्रम, मान्सूनचा चांगला अंदाज, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीवर भर, जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेत या सगळ्या अनुकूल बाबींमुळे निर्देशांकांनी उसळी घेतली. 

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी तब्बल ७१३.२२ कोटी शेअर बाजारात गुंतवले होते, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ५८१.३६ कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. सध्या आयटी कंपन्यांचे आर्थिक निकाल जाहीर होत असून, चांगला लाभांश मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज वर्तवताना ९६ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत केले आहे, त्यामुळेही बाजारातील तेजीला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर निर्यातीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे आगामी काळात व्यवसायांच्या प्रगतीची संधी आहे. या सर्व अनुकूल बाबींमुळे शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली आणि विक्रमी उच्चांक नोंदवले, असे तज्ञांचे म्हणणे आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPVBZ
Similar Posts
सेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) दोन एप्रिल २०१९ रोजी इतिहासात प्रथमच ३९ हजारांचा सार्वकालिक उच्चांकी टप्पा पार करून तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. याआधी २९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने ३८ हजार ९८९पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतर दोन एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारांचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवले
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, भाजप आघाडीवर असल्याचे कल दिसू लागताच, भारतीय शेअर बाजारानेही उसळी घेतली आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ऐतिहासिक ४० हजारांचा टप्पा पार केला.
शेअर बाजार सध्या नरमगरम जागतिक मंदी, देशातील वाहन उद्योगाची स्थिती, घसरलेला आर्थिक विकास दर अशा विविध कारणांमुळे गेल्या सप्ताहात शेअर बाजारात अस्थिरच होता. बाजारातील एकूण वातावरण सध्या नरमगरमच असल्याने सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या स्थितीत कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ
‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’ शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे, की जी कधी क्षणात श्रीमंती देते, तर कधी तितक्याच वेगाने देशोधडीलाही लावू शकते. शेअर बाजाराच्या या ‘किमये’बद्दलचे काही गमतीशीर आणि काही धडे देणारे स्वानुभव सांगत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language